RBI MPC: आरबीआय चा चलनविषयक धोरणाबाबत महत्वाचा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा
मुंबई | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपले चलनविषयक त्रैमासिक पतधोरण जाहीर केले. (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी हे धोरण जाहीर करताना एमपीसीने पॉलिसी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही असे सांगितले. तसेच रेपो रेट (Repo Rate) 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. समितीने धोरणात्मक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के (Reverse repo rate), मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट (MSFR) आणि बँक रेट 4.25 टक्के असा ठेवण्यात आला आहे.
यावेळी गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, कोविड-19 मुळे जागतिक बाजारपेठांमध्ये तसेच भारतालाही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे, यामध्ये आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला आहे. देशात खाजगी गुंतवणुकीला गती देण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे देशाच्या काही राज्यांमधून येणाऱ्या महसुलावरही परिणाम झाला आहे.
चलनविषयक धोरण समिती (MPC) च्या सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) बैठकीच्या धोरणात कुठलाही बदल करण्यात आला नाही. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आर्थिक विकास दराचे उद्दिष्ट 9.5 टक्के ठेवण्यात आले आहे.