भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी धोरण जाहीर केले. रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) आता रेपो दरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे . त्यानंतर रेपो दर 4.90 टक्क्यांवरून 5.4 टक्के झाला आहे. आरबीआयच्या व्याजदरात वाढ करण्याच्या या निर्णयामुळे सर्व बँकांची कर्जे महाग होणार आहेत. या निर्णयाचा परिणाम गृहकर्ज ते कार आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयवर होणार आहे. RBI गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, “भारतीय अर्थव्यवस्था उच्च चलनवाढीशी झुंज देत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर साहजिकच जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम झाला आहे. आम्ही उच्च चलनवाढीच्या समस्येशी झुंज देत आहोत.
“2022-23 साठी वास्तविक GDP वाढीचा अंदाज Q1- 16.2%, Q2- 6.2%, Q3-4.1% आणि Q4- 4% मोठ्या प्रमाणात संतुलित जोखमींसह 7.2% राखला गेला आहे. Q1 2023-24 साठी वास्तविक GDP वाढ अंदाजे आहे ६.७%.”