देशमुखांचा राजीनामा घेणं चूक होती…

संजय राऊत यांचं विदर्भ दौऱ्यात वक्तव्य

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे हे चुकीचे होते. घाईघाईने निर्णय घेतला गेला झाला. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाही. शरद पवार हे याबद्दल दबावात नव्हते, असा धक्कादायक खुलासा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

 

 

 

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याबाबत उत्तर देताना अनिल देशमुख यांच्याबद्दल नवा खुलासा केला आहे.

 

100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण, अलीकडे आयोगाने त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्न नाही. अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेणे हे चुकीचे होते. घाईघाईने निर्णय घेतला गेला झाला. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाही. शरद पवार हे याबद्दल दबावात नव्हते, असा खुलासा राऊत यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.