रणजितसिंह शिंदे यांच्या प्रभावी कामांमुळे माढा मतदारांमध्ये उत्साह आणि आशा

माढा जिल्ह्यातील सध्याची राजकीय स्थिती पाहता जिल्हा दुध संघाचे चेअरमन आणि सोलापूर जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे हे एक उत्तम नेतृत्वाचे प्रतीक बनले आहेत. त्यांच्या समाजसेवे साठीच्या विविध उपक्रमांनी आणि त्याच्याकडे असलेल्या स्पष्ट दृष्टीने त्यांनी माढ्याच्या लोकांमध्ये स्वतःची महत्त्वपूर्ण जागा निर्माण केली आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत माढेकरांकडून त्यांच्या विजयाची आशा व्यक्त केली जात आहे.


त्यांच्या निस्वार्थ सेवाभाव मुळे त्यांनी मोफत डोळे तपासणी शिबिरं आणि मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करून हजारो लोकांना लाभ दिला. तसेच २०१० पासून वृद्धांसाठी काशी, बुद्धगया, माउंट आबू आणि या वर्षी तुळजापूर यात्रा आयोजित केली व त्यामुळे तब्बल १०,००० हून अधिक नागरिकांना आध्यात्मिक समाधान मिळाले. पाणी टाक्या बांधणे असो किंवा शाळांचे दुरुस्ती यासारख्या कामांमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

थेट जनसंवाद आणि चर्चांद्वारे स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित केले करत त्यांनी तब्बल दोन दशकांहून अधिक काळ हा माढेकरांच्या सेवेत घालवला आहे.
म्हणूनच निवडणुकांचे दिवस जवळ येत असताना, रणजितसिंह शिंदे यांचे कार्य आणि विकासात्मक दृष्टिकोन यामुळेच त्यांच्या समर्थनात वाढ झाली आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आणि वचनपूर्ततेमुळे माढा मतदारांमध्ये उत्साह आणि आशा बघायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.