माढा दारफळ (सिना) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन...
दारफळ (सिना) तालुका माढा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा तसेच विविध स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी तसेच सेवानिवृत्तांचा सत्कार समारंभ पार पडला. आदरणीय आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते महसूल, समाज कल्याण, पाटबंधारे बांधकाम व इतर विभागांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
दारफळ ते उंदरगाव रस्ता, दारफळ ते भोईजे, बंधारा ते पाण्याची टाकी रस्ता, दलित वस्ती अंतर्गत कामे, तलाठी कार्यालय इत्यादी कामांसाठी ३ कोटी ४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. प्रसंगी आमदार बबनदादा शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अन्य समस्या समजून घेतल्या आणि समाधान करण्याचे आश्वासन दिले.
सन्मान समारंभात विविध स्पर्धा परीक्षेतून निवड झालेले अधिकारी आणि सेवानिवृत्त यांचा देखील सत्कार करण्यात आला. याप्रसंगीं सौ. संयोगिता गौंडर (कनिष्ठ अभियंता), मा. श्री. दिलीप अजुरे, मा. श्री. शहाजी बारबोले, मा. श्री. रमेश चव्हाण गुरुजी, मा. श्री. मच्छिंद्र सोनवणे (उपअभियंता) यांनी या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थिती दर्शविली.
समारंभात जिल्हा दूधसंघाचे चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे, मा. श्री. अशोककाका लुनावत, सरपंच मा. श्री. अशोक शिंदे सर, मा. श्री. उल्लासकाका राऊत, मा. श्री. शिवाजी बारबोले, मा. श्री. गणेश काशिद सर, मा. श्री. तानाजी लाडगे, मा. श्री. विलास कौलगे साहेब, मा. श्री. रामहरी आदलिंगे, मा. श्री. भुसारे सर, मा. श्री. प्रताप साठे, मा. श्री. श्रीकांत कोरे, उपसरपंच सौ. भावनाताई उबाळे, मा. श्री. विठ्ठल दादा शिंदे, मा. श्री. औंदुबर उमाळे, मा. श्री. कुमार शिंदे, मा. श्री. हेळकर साहेब (PWD), सौ. आशाताई बारखोले, उपअभियंता हांडे साहेब, मा. शहानुरभाई सैय्यद, मा. श्री. बंडगर साहेब (API), तलाठी सौ. चिवटे मॅडम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.