महाळुंग व श्रीपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ संपन्न
श्रीपूर-महाळुंग परिसराच्या विकासाला नवा आयाम मिळेल...
माळशिरस तालुक्यातील मौजे महाळुंग व श्रीपूर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले. श्रीपूर-महाळुंग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक २, ३, ४, ५, ६, १२, १४ व १७ मध्ये भूमिगत गटार, रस्ते डांबरीकरण, काँक्रीटीकरण आदी विकासकामांसाठी आदरणीय आमदार श्री. बबनराव (दादा) शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून 5 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून हे विकासकामे हाती घेण्यात येत आहेत.
या विकासकामांचे भूमिपूजन सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गट नेते राहुल (आप्पा) रेडे, रावसाहेब सावंत-पाटील, जेष्ठ नेते मौला (चाचा) पठाण, अशोक चव्हाण, विक्रमसिंह लाटे, दादा लाटे, रत्नाकर झगडे, नगरसेवक नामदेव पाटील, मारुती रेडे, शरद पाटील, अमरसिंह पिसाळ, भिमराव रेडे, नगरसेवक शिवाजी रेडे, लखन धुमाळ, नाईकनवरे सर, जगदीश इंगळे, शैलेश शेंडगे, लक्ष्मण आहार, नगराध्यक्षा लक्ष्मीताई चव्हाण, नगरसेविका तेजस्विनीताई लाटे, नगरसेविका जोत्स्नाताई सावंत-पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री. रणजितसिंह बबनराव शिंदे यांनी विकासकामांचे भूमिपूजन करून प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणात, “आपल्या गावाच्या विकास कार्याची गती आपल्या सर्वांच्या सहकार्याने नक्कीच वाढेल,” असा विश्वास व्यक्त केला व उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले.
समारंभाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवरांनी या प्रकल्पांच्या माध्यमातून श्रीपूर-महाळुंग परिसराच्या विकासाला नवा आयाम मिळेल, अशी भावना व्यक्त केली.