Ram Satpute : राम सातपुते प्रचारात प्रणिती शिंदेना ठरत आहेत जड ; इंगळगी गावाला सदिच्छा भेट
सोलापूर जिल्ह्यात गावोगावी नागरिकांकडून उत्साहात होतेय स्वागत
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भाजप व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पेक्षा राम सातपुते यांची प्रचार यंत्रणा वरचढ ठरताना दिसून येत आहे. त्यांनी नुकतीच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर येथील इंगळगी गावाला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी उत्साहाने स्वागत करत लोकसभा विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना राम सातपुते यांनी “गेल्या काही वर्षांमध्ये मोदी सरकारने सोलापूर मतदारसंघात भरघोस विकास निधी देऊन गावागावांना विकासाच्या प्रवाहात सामील करण्याचं काम केलंय, विकासाची ही प्रक्रिया निरंतर सुरु ठेवण्यासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला मतरुपी आशीर्वाद दया’ असे आवाहन केले.
यावेळी दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख यांनी गावागावांमध्ये रस्त्याचा विकास असो वा घरकुल योजने अंर्तगत गावकऱ्यांना हक्काची घरे अशी अनेक विकासकामे केली असून आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा मोदी सरकारला संधी देण्यासाठी काम करूया, असा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार सुभाष बापू देशमुख, विधानसभा प्रमुख हनुमंत कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संगपा केरके, जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चीवडशेट्टी, जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष यतीन शहा, पक्षनेता अण्णाराव बासचारे, महिला मोर्चा अध्यक्ष अंबिकाताई पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष आप्पासाहेब मोटे, सरचिटणीस अतुल गायकवाड, युवा मोर्चा अमोल गायकवाड तसेच गावकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.