‘मी माझं मुंडकं कापून टाकेन पण…’; राहुल यांचं वक्तव्य!

काँग्रेस नेते राहुल गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिरच्छेद करेन, पण संघाच्या कार्यालयात जाणार नाही, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं आहे.

देशातील सर्व संस्थांवर आरएसएस आणि भाजपचं नियंत्रण असल्याचा आरोप करत देशातील मीडिया, नोकरशाही, निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे.

भारत जोडो यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत राहुल गांधी (Rahul Gandhi) बोलत होते. यावेळी मी संघाच्या कार्यालयात कधीही जाऊ शकत नाही. तसेच वरुण गांधींची विचारधारा आपण स्वीकारू शकत नाही, असं ते म्हणालेत.

वरुण गांधी हे भाजपमध्ये आहेत. त्यांच्या विचारसरणीशी माझी विचारधारा जुळत नाही. माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. वरूणने ती विचारधारा स्वतःची बनवली. मी वरुणला मिठी मारू शकतो पण ती विचारधारा स्वीकारू शकत नाही, असं राहुल गांधींनी म्हंटलय.

पंजाबमधील आपच्या सरकारची राहुल गांधींनी खिल्ली उडवलीय. पंजाबचा कारभार हा पंजाबमधूनच केला गेला पाहिजे, असंही ते म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.