मातीशी इमान राखा,विषमुक्त शेती पिकवा – पद्मश्री राहीबाई पोपरे

नारायणगाव | हायब्रीड आणि रासायनिक शेती यामुळे कुपोषनासहित आरोग्याच्या अनेक समस्या वाढल्या आहेत. गावरान वान वापरून,सेंद्रिय शेतीवर भर देऊन मातीशी इमान राखा आणि विषमुक्त शेती पिकवा असे आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केले. मुक्ताई समाज मंदिर नारायणगाव येथे ग्रामपंचायत नारायणगाव आणि श्री प्रथमेश ज्वेलर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती आणि जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बिजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी प्रसिध्द अभिनत्री पूनम चांदोरकर, नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश(बाबू)पाटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.वर्षा गुंजाळ,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,श्री.प्रथमेश ज्वेलर्सच्या संचालिका स्नेहल पथमेश जवळेकर, रत्नपारखी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राखी रत्नपारखी, उपसरपंच आरीफ आतार,तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी,माजी उपसरपंच सारिका डेरे,ज्योती दिवटे,मनीषा मेहेत्रे,सुप्रिया खैरे,कुसुम शिरसाट,संगीता खैरे,अश्विनी ताजने, गणेश पाटे,राजेश बाप्ते,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कलापंढरी नारायणगाव मध्ये येऊन इथल्या माता-भगिनींसमोर बोलण्याचे भाग्य लाभले. नारायणगावातील भव्य ऐतिहासिक प्रवेशद्वार, ग्रामदैवत मुक्ताई मंदिर व सभागृह पाहून गावातील संघटित कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री पूनम चांदोरकर यांनी सांगितले. या स्नेह मेळाव्यामध्ये महिलांसाठी मंगेश फाकटकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मानाची पैठणी जिंकण्याचा मान सृष्टी संदीप विश्वासराव यांना मिळाला तसेच रेखा सुपेकर यांना द्वितीय क्रमांकाची सोन्याची नथ आणि सायली म्हात्रे यांना तृतीय क्रमांकाचा चांदीचा दिवा बक्षीस म्हणून देण्यात आला.इतर सहभागी महिलांना देखील विविध बारा बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने ‘ट्रे’ सप्रेम भेट देण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रत्नपारखी फाउंडेशन नारायणगाव यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रास्ताविक सरपंच योगेश पाटे यांनी केले व सूत्रसंचालन प्रा.मेहबूब काझी यांनी केले.उपस्थितांचे आभार माजी उपसरपंच सारिका डेरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.