द्वेषाचा बाजार बंद झाला, आता प्रेमाचे दुकान उघडले – राहुल गांधी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाबद्दल राज्यातील जनतेचे आणि स्थानिक नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सांगितले की, दक्षिणेकडील राज्यात ‘द्वेषाचा बाजार’ बंद झाला असून ‘प्रेमाची’ दुकाने आता उघडली आहेत. कर्नाटकातील जनतेने भांडवलदारांच्या सत्तेचा पराभव केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
राहुल गांधी म्हणाले, काँग्रेस या निवडणुकीत सामान्य लोकांच्या पाठीशी उभी होती. आम्ही द्वेषाने आणि चुकीच्या मार्गाने लढलो नाही तर ही लढाई आम्ही खुल्या मनाने प्रेमाने लढलो. त्यांच्या मते, कर्नाटकातील जनतेने या देशावरील त्यांचे प्रेम दाखवून दिले आहे. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आणि प्रेमाची दुकाने उघडली आहेत.
पहिल्या मंत्रिमंडळात 5 आश्वासने पूर्ण करणार भारत जोडो यात्रे’दरम्यान राहुल गांधी अनेकवेळा म्हणाले होते, मी द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्यासाठी आलो आहे. कर्नाटकातील जनतेला दिलेल्या पाच प्रमुख आश्वासनांवर सरकार स्थापन होताच काम सुरू होईल असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.