राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, काँग्रेसशिवाय प्रबळ विरोधक शक्य नाही ; प्रशांत किशोर यांचा सूर बदलला

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात, काँग्रेसशिवाय प्रबळ विरोधक शक्य नाही ; प्रशांत किशोर यांचा सूर बदलला

देशातील जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्षांसोबत काम केलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रशांत किशोर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपले मत उघडपणे मांडले आणि ममता बॅनर्जींच्या विधानाच्या उलट मत व्यक्त केले आहे. काँग्रेसशिवाय विरोधी पक्ष मजबूत होण्याची शक्यता कमी आहे. किशोर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात असेही सांगितले की भाजप 2022 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये 2017 पेक्षा जास्त जागा आणू शकते.

‘टाइम्स नाऊ’च्या फ्रँकली स्पीकिंग शोमध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये प्रशांत किशोर यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्याची त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे उत्तरे दिली. यादरम्यान त्यांना असा कोणता नेता आहे की ज्याच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल असा प्रश्न विचारला असता त्यांनी नितीश कुमार यांचे नाव घेतले. यावेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आले की, तुमचे नितीश यांच्याशी संभाषण झाले आहे, तेव्हा त्यांचे उत्तर होते, ‘संभाषण तर माझे होतंच असते’

प्रशांत किशोर यांनी सप्टेंबर 2018 मध्ये JDU मध्ये सामील होऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली परंतु नितीश कुमार यांच्याशी त्यांचा संबंध फार काळ टिकला नाही आणि त्यांनी पक्ष आणि राजकारण दोन्हीही सोडले.

याशिवाय प्रशांत किशोर यांना कोणत्या नेत्यासोबत काम करायचे नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. या प्रश्नासाठी त्यांनी राहुल गांधी, अमरिंदर सिंग, नितीशकुमार आणि ममता बॅनर्जी यांची नावे घेतली. प्रशांत किशोर यांनी उत्तर देताना अमरिंदर सिंग यांचे नाव घेतले.

राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात की नाही, या प्रश्नावर किशोर यांनी ते पंतप्रधान होऊ शकतात, असे उत्तर दिले. त्याचबरोबर गांधी घराण्याशिवाय काँग्रेस पक्ष चालू शकतो, असेही ते म्हणाले. प्रशांती किशोर यांना असेही विचारण्यात आले होते की गांधी परिवार काँग्रेसला गैर-गांधी नेत्याच्या नेतृत्वाखाली चालवू देईल का, ज्यावर त्यांनी होय असे उत्तर दिले. मात्र, काँग्रेसच्या उर्वरित नेत्यांची इच्छा असेल तर ते होऊ शकते, असेही त्यांनी आपल्या उत्तरात जोडले.

त्याचवेळी, राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यातील काँग्रेसच्या प्रमुखपदी निवड करण्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, काँग्रेसनेच राहुल गांधी यांची नेता म्हणून निवड केली आहे. 2017 च्या तुलनेत यूपीमध्ये भाजपने जास्त जागांवर निवडून येण्याच्या शक्यतेवर प्रशांत किशोर म्हणाले की हे देखील शक्य आहे.

मात्र, शेवटी किशोर यांना विचारण्यात आले की, भविष्यात ते कोणत्या राजकीय पक्षात सामील होऊ शकतात, तेव्हा त्यांनी गमतीने सांगितले की, सध्या कोणत्याही पक्षात जावे असे काही नाही,  स्वत:चा पक्षही सुरू करू शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.