नाम फाउंडेशन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार
पुणे | नाम फाउंडेशन आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात शनिवारी 22 जानेवारी 2022 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारानुसार, नाम फाऊंडेशन जिल्ह्यातील 26,000 घरांना शोषखड्डे बांधण्यासाठी साहित्य पुरवणार आहे. प्रत्येक कुटुंबाला मनरेगा अंतर्गत त्यांच्या घरांमध्ये शोषखड्डे बांधण्यासाठी 7 दिवसांचे श्रम दिले जातील याप्रमाणे 1486 रुपये प्रति कुटुंबाला मिळतील. एकत्रितपणे, हे 26,000 शोषखड्डे भूजल पातळी वाढवण्यासाठी घरातील बाथरूम आणि स्वयंपाकघरातील 4 टीएमसी राखाडी पाण्याचा शोषून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मदत करतील. त्यामुळे अतिसार आणि डासांमुळे होणारे आजार टाळता येतील. तसेच परिसरातील दुर्गंधी देखील कमी होईल. वेल्हे तालुक्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त काल दुपारी नाम फाऊंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.