पुणे जिल्ह्यातील ४३ शाळा बोगस,

 

 

पुणेः एक-दोन नव्हे तर तब्बल ४३ शाळा पुणे जिल्ह्यामध्ये बोगस आढळल्या आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या ४३ पैकी ३० शाळा कायमच्या बंद करण्यात येत आहेत.

 

या शाळांवर कारवाई1) ऑर्चीड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली2) पुणे इंटरनॅशनल स्कूल, आष्टापुर मळा, लोणी काळभोर, तालुका हवेली3) श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल वीर, तालुका पुरंदर (परस्पर स्थलांतर)4) संकल्प व्हॅली स्कूल, उरवडे, तालुका मुळशी5) एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन, तालुका मुळशी6) राहुल इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी, तालुका मुळशी 7) अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे/ सांगावडे, तालुका मुळशी 8) श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी नेरे, तालुका मुळशी9) श्री. मंगेश इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, अशोकनगर, लिंगाळी रोड, तालुका दौंड (परस्पर स्थलांतर)10) क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल कासूर्डी, तालुका दौंड11) किडझी स्कूल, शालिमार चौक, दौंड12) सुलोचना ताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, तालुका हवेली. 13) तक्षशीला विक्रमशिला इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, किरकटवाडी, तालुका हवेली.

 

संबंधित सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीवर कारवाई होणार आहे. पुण्याताली ग्रामीण भागातील शाळांचा बोगसपणा उघड झालाय.याशिवाय ज्या ३० शाळा अनधिकृतरित्या सुरू होत्या, त्या शाळा बंद झाल्या आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी दिला आहे. त्यापैकी काही शाळा त्यांचं मूळ परवानगी ठिकाण सोडून अन्य ठिकाणी भरत होत्या. आता त्या मूळ पत्त्यावर भरत आहेत. तसेच इतर शाळांना शासनाची मान्यता नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.