पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामधील देय रक्कमेबाबत तात्काळ कार्यवाही करावी – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई | पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामधील देय असलेली रक्कम राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यान्वयीन यंत्रणांनी वितरीत करण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सार्व. उपक्रम वगळून) दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग पुणे -इंदापूर या महामार्गासाठी  संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस, उपसचिव वाय. बी. कुलकर्णी, ॲड शीतल चव्हाण,ॲड.रितेश कुलकर्णी, ॲड सिध्दार्थ देशमुख,टाटा इन्फ्राचे सुभाष लाखे, राजेश सिरोहीया उपस्थित होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे. या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.