पुणे | पुणे महानगरपालिका निवडणुकी आधीच पुणे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. भाजपच्या नगरसेविका अर्चना मुसळे व त्यांचे पती मधुकर मुसळे यांनी नगरसेवक पदाचा व पक्षाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाऊन दिला आहे.
शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत मुसळे यांनी राजीनामा दिला आहे. भाजप अंतर्गत आमच्याविषयी चुकीची माहिती पसरवत आहेत. या कारणांमुळे मुसळे हे नाराज झाले व त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजप अंतर्गत वादाची दखल घेऊन यासंदर्भात बैठक घेऊ असे मुसळे यांना पाटील यांनी सांगितले आहे अशी माहिती मिळत आहे.
महानगरपालिका निवडणुकीआधीच भाजपमध्ये काही आलबेल नाही हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. निवडणुकीआधीच भाजपला अंतर्गत वादाला सामोरे जावे लागत असल्याने भाजप पुढे हि डोकेदुखी ठरू शकते व याचा फटका येत्या निवडणुकीत पक्षाला बसू शकतो.