विक्रम गोखलेंनी मुख्यमंत्री व्हावे; याचा मलाही आनंद होईल : पृथ्वीराज चव्हाण

पुणे | पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला आहे. त्यावेळी प्रसामाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील महाविकास आघाडीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना – भाजपने एकत्र यावे असेही ते यावेळी म्हणाले आहेत. यावरच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गोखलेंना उत्तर दिले आहे.

चव्हाण म्हणाले, विक्रम गोखले हे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांना सांगा कि, राजकीय गोष्टींवर काहीतरी बोलण्यापेक्षा राजकीय पक्षात प्रवेश करा. निवडणुकीला उभे राहून लोकांची मत घ्या. तसेच स्वतः मुख्यमंत्री व्हावे, याचा मलाही आनंद वाटेल.

”शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले होते.”

Leave A Reply

Your email address will not be published.