मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी समृद्ध सहकार पॅनलची हॅट्रिक

पुणे | खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे च्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी समृद्ध सहकार पॅनलने १५ पैकी १४ जागा जिंकून विरोधी परिवर्तन विकास पॅनलचा धुव्वा उडवला. पतसंस्थेचे माजी अध्यक्ष आणि समृद्ध सहकार पॅनलचे पॅनलप्रमुख डॉ.भानुदास कुलाल यांच्या नेतृत्वाखाली समृद्ध सहकार पॅनलने फार मोठा विजय संपादन केला. शुक्रवार दि.१२ मे २०२३ रोजी झालेल्या मतदानात ८०३ पैकी ६८० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानानंतर मतमोजणी सुरू होऊन निवडणूक अधिकारी नीलम पिंगळे यांनी रात्री उशिरा निकाल जाहीर केला.

सर्व मतदार बंधू भगिनींनी सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना सलग तिसऱ्यांदा विजयी करून हॅटट्रिक करून दिली. समृद्ध सहकार पॅनेलचे विजय उमेदवार व पडलेली मते पुढीलप्रमाणे; सर्वसाधारण गट : श्री.भारत चव्हाण -३८०, श्री.दत्तात्रय पोटे – ३७९ श्री.राजेश दरेकर – ३७८, श्री.सुधीर दाते -३७४, श्री.गुरूबा मोराळे -३७२, श्री.श्रीरंग पिंगळे -३७१,श्री.प्रल्हाद झरांडे ३६५, श्री. अनिल ढवळे – ३५०, श्री.संजय मोरे – ३४३, महिला राखीव गट: अनुपमा रासकर -४०२,श्रीमती ज्योती सणस -३९५ अनुसूचित जाती जमाती: श्री.धनंजय तळपे – ३९६, इतर मागास प्रवर्ग: श्री. विठ्ठल शेवते -४२६, विमुक्त जाती जमाती : डॉ.भानुदास कुलाळ ४२८

विजयी झालेल्या उमेदवारांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.