प्रधानमंत्री मोदींनी फुंकले मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग…

‘दिल्ली, महाराष्ट्र आणि मुंबईत एकच सरकार हवं”, असं म्हणत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज मुंबईत विविध विकास कामांचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले ”मुंबईत विकास कामे जलद गतीने करण्यासाठी भाजप आणि एनडीएच्या सरकारला पाठिंबा द्या. मुंबईत २०१४ पासून विकासकामांना गती मिळाली. मात्र, मधल्या काही काळात विकासाचा वेग मंदावला होता. पण पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा विकासाला वेग आला आहे”, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे पाठ थोपटली.

”डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होत आहे. देशातील अनेकांची अर्थव्यवस्था ढासळत आहे. पण आपल्या देशात पायाभूत सुविधांवर अनेक कामे सुरु आहेत. विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची महत्वाची भूमिका आहे. येत्या 25 वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहेत. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. हे काम शिंदे-फडणवीसांच्या माध्यमातून होत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच मुंबईत कामांना वेग आला आहे”, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले, ”जगभर भारतासंदर्भात सकारात्मक वातावरण तयार झालं आहे. आज देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्यासाठी मिशन मोडवर काम सुरु आहे. मुंबई लोकल आणि महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हीटीला देखील यातून फायदा होत होत आहे.

”जगभरात सर्वांना वाटतं भारत चांगल्या प्रकारचे काम करत आहे. भारताबाबत जगभरात सकारात्मकता वाढत आहे. जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. मात्र, भारत आता देखील ८० कोटी लोकांना मोफत राशन देण्याचे काम करत आहे”, असंही प्रधानमंत्री म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.