आनंदाची बातमी! पुण्यातील सर्व पर्यटनस्थळं आजपासून खुली
पुणे। पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे मंगळवारपासून खुली झाली आहेत पर्यटकांसाठी हि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळी पर्यटकांनी हजेरी लावायला सुरुवात केलीये. कोरोनाच्य पार्श्वभूमीवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळं यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांचा हिरमोड झाला असला तरी आता हिवाळ्यात गुलाबी थंडीचा आनंद घेत पर्यटनाचा आनंद निर्धास्तपणे लुटता येईल.
पावसाळ्यात निर्बंध शिथील न होऊनही अनेकजण फिरण्यासाठी बाहेर पडले होते. परंतु पोलिसांनी पर्यटकांना पर्यटन स्थळी जाण्यापासून मज्जाव केला होता. परंतु आता जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना पर्यटकांना भेट देता येईल.