ऐकीव माहितीवरुन अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले – परमबीर सिंह यांचे स्पष्टीकरण…
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप आपण ऐकीव माहितीवरून केले, असा धक्कादायक खुलासा परमबीर सिंह यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदिवाल चौकशी आयोगाला याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध 100 कोटी रुपये वसुलीचे आरोप आपण ऐकलेल्या गोष्टींवर केले, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे सिंग यांनी कोर्टासमोर साक्षीदार म्हणून हजर राहण्यास नकार दिला आहे. परमबीर सिंह यांच्याकडे त्यांनी केलेल्या आरोपांसाठी पुरावे नाहीत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
सचिन वाझे प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने चांदीवाल चौकशी आयोगाची स्थापना केली होती. परमबीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन हटवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप करण्यात आले होते.