कुंग फू पंड्या करतोय निवृत्ती चा विचार..! पंड्या सोडणार क्रिकेटचा हा फॉरमॅट?
कुंग फू पंड्या करतोय निवृत्ती चा विचार..! पंड्या सोडणार क्रिकेटचा हा फॉरमॅट ?
कोणत्या कारणासाठी हार्दिक करतोय निवृत्तीचा विचार!
2021 विश्वचषक T 20स्पर्धेतील अत्यंत निराशाजनक कामगिरीनंतर टीम इंडियातून बाहेर झालेला हरहुन्नरी खेळाडू हार्दिक पंड्या निवृत्त होणार असल्याची बातमी येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पाठीच्या दुखण्याने दुखापतग्रस्त असून जर त्याला क्रिकेट कारकीर्द पुढे न्यायची असेल तर क्रिकेटचा एक फॉरमॅट सोडण्याची गरज वाटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक यासाठी कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे.
इनसाइड स्पोर्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने दिलेली माहिती अशी आहे की, पंड्या दुखापतीशी झुंजत असून आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे, मात्र त्याने अजून याविषयी अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. हार्दिक पंड्या अद्याप टीम इंडियाच्या कसोटी टीम चा भाग नाही. मात्र, त्याची निवृत्ती ही भारतीय टीम साठी मोठा झटका असेल. यासाठी भारतीय संघाला त्याचा बॅकअप लवकरच शोधण्याची गरज लागेल.