‘पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ’ : पडळकरांची घणाघाती टीका…
‘पवार कुटुंब राज्यातील OBC समाजाचा कर्दनकाळ’ : पडळकरांची घणाघाती टीका…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांना ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. या निर्णयामुळे विरोधी पक्षाने सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. OBC आरक्षणाच्या मुद्दयावरुन भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी थेट पवार कुटुंबीयांवरतीच टीका केली आहे. ‘राज्यातील ओबीसींचा कर्दनकाळ हे पवार कुटुंब आहे.’ अशी घणाघाती टीका पडळकर यांनी केली आहे.
यावेळी पडळकर म्हणाले, ‘काल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला, या निर्णयामुळे OBC समाज सरकारवर नाराज आहे. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारचा घातला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपले नातेवाईक निवडणुकीत उभे करायचे आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षित जागा असणार नाही. 346 जातींना राजकारण करण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यावर हा अन्याय आहे. OBC राजकीय आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. सरकारला त्यांची जागा दाखवून द्यावी असं वक्तव्य पडळकर यांनी केलं आहे.