पुणे: पुणे शहरात सामाजिक, व्यावसायिक व राजकीय क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे युवा नेतृत्व सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाऊंडेशनच्या वतीने १७ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान’सुपर सनीज् वीक’ चे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या युगात तरुण वर्ग मोबाईलच्या आहारी जाणार गेला आहे. त्यांना मैदानी खेळांची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चित्रकला, बॉक्सिंग, स्केटिंग, तायक्वांदो, पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन आणि डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे. स्वत:त सक्षम बनत देशाला देखील समृद्ध करण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सनी निम्हण व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
आज सनी निम्हण हे त्यांचे वडील माजी आमदार स्व. विनायक (आबा) निम्हण यांचा लोककल्याणाचा वारसा सक्षमपणे पुढे घेऊन जात आहेत. वडिलांच्या जयंती निमित्त ‘कार्यसम्राट महाआरोग्य शिबीर’या नावाने पुणे शहराच्या इतिहासात सर्वात मोठे आरोग्य शिबीर भरविण्याचा मान सनी निम्हण यांनी मिळवला आहे. या शिबिरात त्यांनी पुणे शहरातील ५९ हजाराहून अधिक नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच स्व. विनायक निम्हण यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त पुणे शहरात शिक्षण घेणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ‘विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’ सनी निम्हण यांनी दिली आहे. यामध्ये ३५० हून अधिक विद्यार्थांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सनी निम्हण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर भरवले होते. यामध्ये १००० रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले होते. याशिवाय युवकांसाठी’ उद्योजक कर्ज कार्यशाळेचे आयोजन केले. होते. यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना कर्ज मिळवून देण्यात मोलचे योगदान त्यांनी दिले. तसेच महिला वर्गासाठी देखील ‘आरी वर्क’ प्रशिक्षण शिबीर राबविले. या महिलांच्या हाताला काम दिले. त्यांना मोफत शिलाई मशीन दिल्या. यातून तयार साहित्य विकण्यासाठी महिला वर्गाला मार्केटिंगचे देखील प्रशिक्षण दिली.
सनी निम्हण यांनी उद्योजक म्हणून देखील मोठे नाव कमावले आहे. पुणे शहराचा मानबिंदू ठरणाऱ्या व मोठ्यांपर्यंत सर्वांच्या मनाला भावेल असे ‘सनीज् वर्ल्ड’ची व्यावसायिक निर्मिती केली. आजही त्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे. याच जोरावर त्यांना ‘युवारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्याची आवड म्हणून सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध संकल्पना ते राबवत असतात.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी https://www.sunnynimhan.com/ या वेबसाईट आपली नावनोंदणी करा किंवा 8308123555 या क्रमांकावर संपर्क अस्धावा असे आवाहन सनी निम्हण व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
स्पर्धेची तारीख , वेळ, व ठिकाण –
१. चित्रकला स्पर्धा १७,१८, १९ व २४ फेब्रुवारी २०२४
सकाळी ८ ते १० दरम्यान
स्थळ- औंध, बोपोडी, खडकी, वडारवाडी, सोमेश्वरवाडी आणि साप्रस
——-
२. जिल्हा अजिंक्य बॉक्सिंग स्पर्धा
१७,१८,१९ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ४ वाजेपर्यंत
स्थळ- शहीद तुकाराम ओंबाळे मैदान, गोखलेनगर शाळेशेजारी, गोखलेनगर
——
३. जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा
२५ फेब्रुवारी २०२४
सकाळी ८ वाजेपासून
स्थळ- पाषाण-बाणेर लिंक रोड, न्यू डीपी रोड,
——-
४. भव्य दे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
२० ते २५ फेब्रुवारी २०२४
सायंकाळी ४ वाजेपासून
स्थळ- इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय मैदान, औंध
——
५. जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा
२४,२५ फेब्रुवारी २०२४
सकाळी ८ वाजेपासून
स्थळ- सेन्ट्रल पार्क, आपटे रोड, डेक्कन
——
6. पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन
२५ फेब्रुवारी २०२४
पहाटे ५ वाजेपासून
स्थळ- बालेवाडी
——