अरे बापरे! मारुतीकडेही एवढ्या नाहीत; ही कंपनी २० कार लाँच करणार

कारच्या किंमती कमालीच्या वाढू लागल्या आहेत. पेट्रोल, डिझेलच्या कार आता सहा सात लाखांच्या खाली येत नाहीएत. येतात त्या पण खूपच एन्ट्री लेव्हलच्या. यामुळे कंपन्या देखील नवनवीन कार आणि फिचर्स देऊन बाजारात आपले पाय रोवण्याचे प्रयत्न करत आहेत. आज एका कंपनीने असे स्टेटमेंट केलेय की मारुतीकडे देखील एवढ्या गाड्यांचा ताफा नाहीय.

ऑडी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रॉडक्शनची तयारी करत आहे. जर्मन लक्झरी कार ब्रँडने २०२६ पर्यंत बाजारात २० कार लाँच करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेलवरील कार असतीलच परंतू जादातर इलेक्ट्रीक कारदेखील असणार आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

ऑडीचे डिझाईन प्रमुख मार्क लिचटे यांनी ब्रिटिश ऑटोमोटिव्ह प्रकाशन ऑटो एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत या मोठ्या योजनेचा खुलासा केला आहे. ऑडीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे उत्पादन असेल, पुढील अडीच वर्षांत 20 हून अधिक कार सादर केल्या जातील. एवढेच नाही तर कंपनी ईव्हीवरही काम करत आहे. अडीच वर्षांत ऑडीच्या इतिहासातील 20 हून अधिक कार असलेली सर्वात मोठी लाइन-अप बाजारात येईल, असे ते म्हणाले.

ऑटोमेकर जगभरातील हरित आणि स्वच्छ पॉवरट्रेन तंत्रज्ञानावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करत आहे. ऑडीचे उत्पादन आणि त्याचे अनोखे तंत्रज्ञान त्याला वेगळे करते. ऑटोमेकर ए6 ई-ट्रॉन सारख्या नवीन पिढीच्या इलेक्ट्रिक कारवर लक्ष ठेवून आहे, ज्याची चाचणी देखील केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.