गुजरातमधील या गावात निवडणूक प्रचार बंदी, मतदान मात्र १००%!

गुजरात मधील या गावातील लोकांना असे वाटते की निवडणुकीतील उमेदवारांना प्रचार करण्यास परवानगी देणे गावासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करू दिलेला नाही. गावात निवडणूक प्रचाराला पूर्णपणे बंदी आहे.
गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. तर राजकोट जिल्ह्यातील एका गावात मात्र शांतता आहे. राजसमाधीयाला हे गाव निवडणुकीच्या या सर्व नाटकापासून आणि प्रचारापासून दूर आहे. याचे कारणही ग्रामस्थांनी सांगितले आहे.

गावातील लोकांनी सर्वच राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना प्रवेश व प्रचार करण्यास बंदी घातली आहे. मात्र, गावातील लोक नक्कीच मतदान करतील आणि जे मतदान करणार नाहीत त्यांना दंडही होणार आहे. राजसमाधियाला गावातील लोकांना असे वाटते की उमेदवारांना प्रचार करण्यास परवानगी देणे या भागासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे गावात कोणत्याही पक्षाला प्रवेश आणि प्रचार करू दिलेला नाही. गावात प्रचाराला पूर्ण बंदी आहे. राजकोटपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजसमाधियाला गावाने मतदानात जास्तीत जास्त सहभागी व्हावे यासाठी येथील ग्रामस्थांनी केवळ राजकीय प्रचारावरच बंदी घातली नाही, तर मतदान न करणाऱ्यांना ५१ रुपयांचा दंडही ठोठावला जाणार आहे. ग्रामविकास समितीने गावातील लोकांसाठी अनेक नियम केले आहेत. गावातील लोक त्याच्याशी जोडलेले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आकारला जातो. सक्तीचे मतदान करण्याचाही नियम आहे. आतापर्यंत गावात जवळपास 100 टक्के मतदान होत आहे.

सरपंचाची निवड सर्वसंमतीने होते
या गावचा सरपंचही सर्वसंमतीने निवडला जातो. दंडाच्या निर्णयामुळे येथे जवळपास 100 टक्के मतदान झाल्याचे विद्यमान सरपंच सांगतात. 1700 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावाने एक समिती स्थापन केली आहे. मतदानाच्या काही दिवस आधी समितीचे सदस्य गावकऱ्यांची बैठक घेतात आणि कोणाला मतदान करता येत नसेल तर समितीला त्याचे कारण सांगावे लागते. हा नियम 1983 पासून लागू आहे, राजकीय पक्षांना गावात प्रचार करू न देण्याचा नियम 1983 पासून लागू असल्याचे सरपंचांनी सांगितले. येथे कोणत्याही पक्षाला प्रचार करण्यास परवानगी नाही. राजसमाधियाला गावात प्रचार केला तर त्यांची मते कमी होतील, हा विश्वास राजकीय पक्षांनाही आहे.

वाय-फाय, कॅमेरे, आरओ प्लांट
यांसारख्या आधुनिक सुविधा या गावात आहेत. वाय-फायद्वारे इंटरनेट कनेक्शन, सीसीटीव्ही कॅमेरे, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट अशा जवळपास प्रत्येक आधुनिक सुविधा आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचे जीवन सुखकर झाले आहे. गावात सुमारे ९९५ मतदार आहेत. ते त्यांच्या इच्छेनुसार मतदान करतात.

Leave A Reply

Your email address will not be published.