अजूनही मुंबईतील काही भागात सरकारी बँका का नाहीत? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा सरकारला सवाल

अजूनही मुंबईतील काही भागात सरकारी बँका का नाहीत? शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचा सरकारला सवाल

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील खासदार आपल्या जनतेचे विविध प्रश्न अतिशय सडेतोड पणे मांडताना दिसत आहेत. दक्षिण मुंबई आणि मध्य चेंबूर मतदारसंघात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या भागामध्ये सरकारी बँका का नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये ते म्हणाले की “मी जेव्हा या प्रश्नावर अभ्यास केला तेव्हा मला समजले की हा झोपडपट्टी भाग नॉन रिकव्हरी झोनमध्ये मोडला जातो. त्यामुळे तेथील जनतेला प्रधानमंत्र्यांच्या गरीब कल्याण योजनांचा लाभ घेता येत नाही. जर तेथे बँकाच उघडल्या नाहीत तर रिकव्हरी कशी होणार? आणि येथील जनतेला शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येणार?

यावर उत्तर देताना अर्थराज्यमंत्री भागवत कराड म्हणाले की बँक शाखा उघडणे हे राज्यस्तरीय बँक कमिटी कडे त्याचे अधिकार आहेत. या समितीने जर असे सुचवले जर सदस्यांना त्यांच्या भागामध्ये बँक शाखा चालू करायची असेल तर State Level Bank Committee चे बँक अधिकारी त्या भागामध्ये जाऊन सर्व्हे करतील. अशा प्रकारे आपण बँक उघडू शकतो व त्या भागामध्ये वेगवेगळ्या योजना लोकांपर्यंत पोहचवू शकतो.

शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी जनतेच्या अडचणी बारकाईने ओळखताना या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारला प्रश्न विचारला. खा.शेवाळे यांच्या मतदारसंघात जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेली धारावी तसेच चेंबूरचा झोपडपट्टीचा भाग येतो. अशा भागाचे प्रतिनिधीत्व करताना बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते.

Leave A Reply

Your email address will not be published.