बेल्हे येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी

नवीन बेल्हे पोलीस ठाणे निर्मिती करण्याची आमदार अतुल बेनके यांची मागणी
जुन्नर तालुक्यातील पुर्व भागात बेल्हे ता. जुन्नर येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी केली आहे.

आमदार अतुल बेनके यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जुन्नर तालुक्यातील पुर्व भागात बेल्हे या ठिकाणी नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधींकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. सदर मागणीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी नवीन पोलीस ठाणे निर्मितीबाबत प्रस्ताव पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना १८/११/२०२१ रोजी प्रस्ताव पाठवलेला आहे सध्या आळेफाटा येथे पोलिस ठाणे आहे. तालुक्याच्या पूर्व भागात बेल्हे हे गाव असून या ठिकाणी आठवडे बाजार ( बैलांचा बाजार) तसेच बाजार पेठ मोठी आहे. बेल्हे परिसरात गुन्हेगारी रोखण्याच्या दृष्टीने सदर ठिकाणी नवीन पोलीस ठाणे निर्माण होणे गरजेचे आहे नवीन पोलीस ठाणे निर्माण झाल्यास बेल्हे परिसरातील गावातील ग्रामस्थांना तातडीची मदत उपलब्ध होईल व गुन्हेगारीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवता येईल असे आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
नवीन बेल्हे पोलीस ठाणे झाल्यानंतर बेल्हे, गुंजाळवाडी, बांगरवाडी ,गुळुंचवाडी, आणे, आनंदवाडी, पेमदरा ,नळावणे, शिंदेवाडी ,तांबेवाडी ,रानमळा मंगरूळ, साकोरी ,बोरी बुद्रुक, जाधवाडी, झाप शिरोली ,सुलतानपूर, निमगाव सावा, औरंगपूर, पारगाव तर्फे आळे, पिंपरी कावळ, या भागातील नागरिकांना तात्काळ मदत मिळणार आहे तरी नागरिक व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बेल्हे ता.जुन्नर येथे नवीन पोलीस ठाणे निर्मिती करण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.