VIVO च्या जागी IPL ला मिळाले नवे Title Sponsor

नवी दिल्ली | भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहांपैकी एक, टाटा समूह, या वर्षापासून चीनी मोबाइल निर्माता विवोची जागा इंडियन प्रीमियर लीगचे शिर्षक प्रायोजकत्व म्हणून घेणार आहे, IPL च्या इव्हेंट प्रशासकीय समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. “टाटा समूह आयपीएल शिर्षक प्रायोजकत्व मिळणार आहे ,” आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला या संदर्भात माहिती दिली आहे.

Vivo ने 2018-2022 मध्ये शिर्षक प्रायोजकत्व हक्कांसाठी रु. 2200 कोटींचा करार केला होता परंतु 2020 मध्ये भारतीय आणि चिनी लष्करी सैनिकांमधील गलवान व्हॅलीतील लष्करी वादानंतर, या ब्रँडने एका वर्षासाठी ब्रेक घेतला आणि IPL मध्ये Dream11 ची त्यांची जागा घेतली. विवो 2021 मध्ये आयपीएल शिर्षक प्रायोजक म्हणून पुन्हा इच्छूक होते तरीही कंपनी योग्य बोलीदाराकडे हक्क हस्तांतरित करण्याचा विचार करीत असल्याची बातमी पसरली होती आणि बीसीसीआयने या संदर्भात मान्यता दिली होती.

बोर्ड आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार 2020 सीझनपर्यंत होता. दरम्यान, एका वर्षाच्या ब्रेकमुळं हा करार 2023 पर्यंत वाढवण्यात आला. परंतु, आज झालेल्या बैठकीनंतर टाटा ग्रुप 2022 आणि 2023चे टायटल स्पॉन्सर असल्याची घोषणा करण्यात आली आहे. “चिनी उत्पादनांबद्दल नकारात्मक भावना असल्याने, करारासाठी एक हंगाम शिल्लक असताना कंपनीला प्रायोजकत्व सोडावे लागले असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.