ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! – खा. नवनीत राणा

ठाकरे-परब अपयशी, शरद पवारांमुळे ST कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळेल! – खा. नवनीत राणा

अमरावती | देशाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब व अर्थमंत्री अजित पवार यांच्या समवेत बैठक घेतली. या प्रश्नात खुद्द पवारांनी  लक्ष घातल्याने आता आशेचा किरण निर्माण झाला आहे.यातून एक चांगला संदेश सर्वांना मिळेल व आंदोलनावर लवकर तोडगा निघेल अशी आशा बाळगूया असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री अनिल परब हे सरकारमध्ये फेल गेल्याची टीका खासदार राणा यांनी यावेळी केली.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही ताेडगा निघालेला नाही. आज शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनिल परब हे अपयशी ठरले आहेत हे सिद्ध हाेत आहे. हे तीन पक्षाचे सरकार कोण चालवते आहे हे आज स्पष्ट झाले आहे.

शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घातल्याने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. या आंदोलनावर लवकरच तोडगा निघेल अशी अपेक्षा खा. राणा यांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.