पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगताप कुटुंबाला पत्राद्वारे धीर दिला.
आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अतीव दुःख झाले. माझ्या संवेदना जगताप कुटुंबियांसोबत आहेत. सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे स्व.आ.जगताप हे जमीनीसोबत जोडलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले.
पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील. त्यांच्या निधनाने भाजप आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, असे मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Very good PM
What a Man