चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्ही देश विकणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार – नाना पटोले

मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या (Nana Patole) वक्तव्याविरोधात राज्यात सध्या भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंच्या वक्तव्याविरोधात राज्यात जोरदार गदारोळ सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी  पटोलेंविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. याला नाना पटोलेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटलांनी माझ्या विरोधात कुठे जायचं तिकडं जावं, आम्हीही देश विकणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार असे नाना पटोले म्हणाले. विमानतळ विकले, समुद्र विकले, कंपन्या विकल्या आहेत, त्याविरोधात आम्हालाही कोर्टात जावं लागेल असे पटोले म्हणाले.

तथाकथित वक्तव्याबाबत भंडारा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये सत्य समोर येईल. पंतप्रधान पदाची गरीमा संपवणे हाच भाजपचा धंदा आहे. आम्हीही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भाजपविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मोदी नावाचा गुंड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे, जबाब नोंदवणे सुरू आहे, अशी माहिती नाना पटोलेंनी यावेळी दिली आहे.

पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर गेले त्यावेळी पंजाब सरकारने त्यांना दौऱ्यावर बोलवलं नव्हतं, हे आपले राजकीय दुकान चालवायला गेले होते, त्यातही भाजपने नौटंकी केली. कोण कुणाला मारायला निघालं? कशा प्रकारची नौटंकी भाजपकडून सुरू आहे, हे सर्वांच्या लक्षात येत आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल, असं सूचक विधान पटोले यांनी केलं आहे. नाना पटोलेंच्या त्या वक्तव्याच्या व्हिडिओनंतर त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून जोरदार टीका सुरू होती, भाजप नेत्यांना नाना पटोलेंनीही आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.