पंतप्रधानांची पंजाब मधील सभा रद्द! सुरक्षेच्या कारणांमुळे नाही तर रिकाम्या खुर्च्यांमुळे सभा रद्द – काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली | पंजाबमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षेचे उल्लंघन झाल्याने एक मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. यासंदर्भात भाजपने पंजाब काँग्रेस सरकारवर अशी परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला. ज्यामुळे पंतप्रधानांचा ताफा अडवला गेला. रॅलीच्या ठिकाणी जात असताना, पीएम मोदी पंजाबच्या भटिंडा येथील फ्लायओव्हरवर सुमारे 20 मिनिटे अडकले होते. कारण निदर्शक शेतकऱ्यांनी पुढे रस्ता अडवला होता. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या कर्मचार्‍यांनी पंतप्रधानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाभोवती एक रिंग तयार केल्याने घटनास्थळावरील माध्यमांच्या दृश्यांमध्ये त्याचा ताफा अडकलेला दिसत होता.

या घटनेच्या काही मिनिटे आधी यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी “मोदी जी, जोश कसा आहे?”  “उरी: द सर्जिकल स्ट्राइक” या ब्लॉकबस्टर चित्रपटातील एका लोकप्रिय संवादाचा हवाला देत पोस्ट केली होती.

यावर बोलताना स्मृती इराणी यांनी पत्रकारांना सांगितले की, ” आमच्यासारख्या लोकांना सर्वात जास्त क्रोधित करणारी गोष्ट म्हणजे – जेव्हा भारताच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग झाला तेव्हा काँग्रेस नेत्यांचा आनंद उफाळून आला आणि त्यांनी विचारले की, मोदी जी जोश कसा आहे”.

यावर श्रीनिवास यांनी खुलासा व्यक्त करताना म्हंटले की, राष्ट्रीय माध्यमांवर बातम्या येण्याच्या काही मिनिटांपूर्वी पोस्ट केलेले त्यांचे ट्विट हे सुरक्षेतील त्रुटींबद्दल थट्टा करणारे नव्हते. “जेव्हा मी 2.37 वाजता ट्विट केले, तेव्हा सर्व वृत्तवाहिन्या पंतप्रधानांच्या रॅलीतील रिकाम्या खुर्च्यांबद्दल बातम्या देत होत्या. मी रिकाम्या खुर्च्यांबद्दल ट्विट करत होतो, कथित सुरक्षेतील त्रुटींबद्दल नाही,” असे श्रीनिवास यांनी सांगितले.

एएनआयच्या वृत्तानुसार , पीएम मोदींनी भटिंडा विमानतळ अधिकाऱ्यांना सांगितले: ” अपने सीएम को धन्यवाद कहना , की में भटिंडा विमानतळ तक जिंदा लौट पाया (तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार माना की मी भटिंडा विमानतळापर्यंत जिवंत येऊ शकलो).”

मोदींच्या सभेला लोकं नसल्याने त्यांनी सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असा आरोप काँग्रेसने  केला आहे. पंतप्रधान ज्या फिरोजपूर रॅलीचे नेतृत्व करत होते, त्या रॅलीला रद्द करण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला फारशी उपस्थिती नव्हती असं काँग्रेसने म्हंटले आहे.

भाजपचे प्रमुख जेपी नड्डा यांनी राज्य पोलिसांवर आंदोलकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप केला. ” राज्य पोलिसांना लोकांना रॅलीत येण्यापासून रोखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सीएम चन्नी यांनी एकतर या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी किंवा निराकरण करण्यासाठी फोनवर येण्यास नकार दिला. असे ट्विट” नड्डा यांनी केले.

काँग्रेसने मात्र हे आरोप फेटाळून लावले. “पीएमओ, भाजपचे मंत्री किंवा पंतप्रधान हे का बोलत नाहीत? पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला झाला का? तिथे कोणी नक्षलवादी किंवा दहशतवादी होता का?” असा सवाल काँग्रेस पक्षाचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.