आमदार सत्यजीत तांबे यांना MIT संस्थेच्या भारतीय छात्र संसदेकडून ‘आदर्श युवा विधायक सन्मान- 2024’ पुरस्कार प्रदान !
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना विधानपरिषदेत आवाज देणारे, तसेच युवक विद्यार्थी यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात नेहमी अग्रेसर असलेले विधानपरिषदेचे युवा आमदार सत्यजीत तांबे यांना त्यांच्या कार्याची दखल घेत, MIT संस्थेच्या भारतीय छात्र संसदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श युवा विधायक सन्मान 2024 या पुरस्काराने गौरविण्यात आले.
एक लोकप्रतिनिधी म्हणून माझा होत असलेला हा सन्मान खरं तर माझ्यावर विश्वासाने ही जबाबदारी सोपविणाऱ्या जनतेचा सन्मान आहे, असे मी मानतो.
आगामी काळातही आपल्याला जनतेचे विविध प्रश्न सोडवायचे आहेत, महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून घडविण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठी हा पुरस्कार मला बळ देणारा, ऊर्जा देणारा ठरणार आहे. अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.