फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी सोडला पक्ष सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी सोडला पक्ष सपत्नीक काँग्रेसमध्ये प्रवेश

उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असणाऱ्या मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला शिवोली विधानसभेसाठी तिकीट मिळावं, यासाठी लोबोंचे प्रयत्न सुरु होते.

गोव्यातील महत्त्वाच मतदारसंघ असलेल्या कळंगुट (Calangute) मतदारसंघाचील राजकारण तापलेलं आहे. यातच सोमवारी मायकल लोबो यांनी भाजपला सोडचिट्ठी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यांनी देखील काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपला सातत्यानं घरचा आहेर देण्याच्या नेत्यांपैकी मायकल लोबो (Michael Lobo) हे एक होते. त्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा भाजपला घरचा आहेर देत भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांशी देखील वाद घातला होता. लोबो यांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभूपाऊसकर तसंच मॉविन गुदिन्हो यांच्यासोबतच्या वादाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी भाजपला राम-राम ठोकलाय. लोबो हे सपत्नीक काँग्रेसमध्ये (Goa Congress) दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनीही त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ गोव्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून उत्तर गोव्यातील या मतदारसंघात मायकल लोबो यांनी नेहमीच आपलं वर्चस्व राखलं आहे. त्यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे आता गोव्यातील राजकारण अधिकच रंगतदार स्थितीत आलं आहे.

गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी मायकल लोबो यांच्या कळंगुटमधील घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, अत्यंत आक्रमक झालेल्या मायकल लोबो यांना शांत करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून झाले असावेत. आता निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्यानंतर अखेर मायकल लोबो यांनी कमळाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. येत्या निवडणुकीत डिलायला लोबो शिवोलीतून तर मायकल लोबो हे कळंगुटमधून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.