वीजप्रश्नी नगरसेवक रवी लांडगे आक्रमक, लांडगेंचा महावितरण कार्यालयावर मोर्चा

भोसरी | भोसरी आणि परिसरात सातत्याने होत असलेला विजेचा लपंडाव आणि इतर समस्या घेऊन नगरसेवक रवी लांडगे आणि समर्थकांनी भोसरी, बालाजीनगर, गवळीमाथा येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. भोसरी परिसरातील विजेचा लपंडाव थांबवून नागरिकांना २४ तास सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी नगरसेवक रवी लांडगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांनी आंदोलनाच्या माध्यमातून हजारो नागरिकांच्या विशाल मोर्चाचे आयोजन केले. ट्रान्सफार्मरची क्षमता वाढवण्याचे आणि नादुरूस्त मिनी बॉक्स तातडीने बदलण्यास सुरूवात करण्याचे आश्वासन यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिले. दिलेल्या आश्वासनाची लवकर पुर्तता झाली नाही तर येत्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रवी लांडगे आणि सोनाली उदावंत यांनी दिला आहे. यावेळी नागरिकांच्या वतीने नगरसेवक रवि लांडगे, सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत, प्रवीण लांडगे, मंगेश आंबेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले.

गेल्या काही महिन्यांपासून भोसरीच्या अनेक भागात तासन्‌तास वीज गायब होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. व्यापारी वर्गही मेटाकुटीला आला आहे. याप्रकरणी महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे अनेकदा तक्रारी करूनही नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.