पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

देशातील सर्वाधिक लोकप्रिय महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधी गटांची मोट बांधण्याच्या दृष्टीने या भेटीला मोठं महत्व आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी या दौऱ्याबाबत माध्यमांना अधिकृत माहिती दिली आहे.

पुढील आठवड्यात मंगळवारी ममता बॅनर्जी या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचं तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सांगितलं आहे.

मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जी काही उद्योगपतींच्याही भेटीगाठी घेणार आहे. पश्चिम बंगालमध्ये औद्योगिक वाढीसाठी या भेटी होणार आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राजस्थान दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात राजस्थानमधील पक्षाची ताकद वाढवण्यासाठीच्या संबंधीची चर्चा त्या कार्यकर्त्यांसमवेत करणार आहेत. गोवा, मेघालय, त्रिपुरा आणि आसाममध्येही तृणमूलने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तिसऱ्या आघाडीच्या नेतृत्व म्हणून ममता बॅनर्जी यांच्याकडे पाहिलं जात आहे. ममता मुंबईसोबतच मोदींच्या वाराणसीवरही लक्ष ठेवून आहेत. लवकरच आपण वाराणसीत जाणार असल्याचं ममतांनी जाहीर केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.