‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’ नवाब मलिकांच आणखी एक ट्विट..
मुंबई | राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चांगले चर्चेत राहिले आहेत आणि त्याला कारण देखील तसेच आहे.
‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’ नवाब मलिकांच आणखी एक ट्विट..
मलिक हे सध्या दुबई दौऱ्यावर आहेत. हा त्यांचा शासकीय दौरा आहे. परदेश दौऱ्यावर असूनही समीर वानखेडे यांच्यावरील त्यांचे हल्ले थांबलेले नाहीत. नवाब मलिकांनी मध्यरात्री रात्री समीर वानखेडेंचा जुना फोटो ट्विट केला आहे. या ट्विटसोबत नवाब मलिकांनी एक प्रश्न देखील विचारला आहे.
समीर वानखेडे यांच्या निकाहच्या वेळचा हा फोटो असल्याचे दिसत आहे. मलिक यांनी याच फोटोवरून एक सवाल केला आहे. ‘कबूल है, कबूल है, कबूल है…यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede ?’ असे प्रश्नार्थक ट्वीट मलिक यांनी केले आहे.
समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीयांच्या आरक्षणातून नोकरी मिळवली असा दावा देखील नवाब मलिकांनी केला आहे. हा वाद आता मुंबई हायकोर्टात गेला आहे. तसेच वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नाव मलिक यांच्याविरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. मलिक यांनीही या दाव्याविरोधात आपल्याकडील पुरावे सादर केले आहेत.