महाराष्ट्राचा इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावे – आ. अतुल बेनके

मुंबई | महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावे. तसेच सध्या चित्रपटगृहात सुरु असलेल्या पावनखिंड चित्रपटालाही करमुक्त करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर न बोलता, विरोधक मात्र भलत्याच विषयाकडे राज्याचे लक्ष वळवत आहेत, अशी टीका आमदार अतुल बेनके यांनी केली. काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन भाजपने अनेक मुद्दे मांडले आहेत. या चित्रपटाचे शो वाढवावेत तसेच या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मुद्द्यावर बोलताना अतुल बेनके यांनी देखील महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास दाखविणाऱ्या चित्रपटांना महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावे अशी मागणी सभागृहापुढे मांडली.

Leave A Reply

Your email address will not be published.