एक और फर्जीवाड़ा… समीर वानखेडें विरोधात नवाब मलिक यांचे आणखी एक ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासंदर्भात आणखी एक ट्विट करत पुन्हा एकदा वानखेडे कुटुंबावर निशाणा साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वानखेडे यांच्या संदर्भात नवनवे खुलासे करणाऱ्या नवाब मलिक यांनी यावेळी समीर वानखेडे यांच्या धर्माबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यूपत्राचे दाखले मलिक यांनी शेअर केले आहेत. यामधील एका दाखल्यात धर्माचा उल्लेख हिंदू तर दुसऱ्यात मुस्लिम असा उल्लेख आहे.

समीर वानखेडे यांच्या आई झहेदा ज्ञानदेव वानखेडे यांच्या मृत्यूचे हे दाखले आहेत. १६ एप्रिल २०१५ रोजी झहेदा यांचं निधन झाल्याचा उल्लेख या दाखल्यात आहे. या ट्विट मधून मलिक यांनी यावेळी या दोन्ही दाखल्यांवर उल्लेख असलेल्या धर्माकडे लक्ष वेधलं आहे. एका दाखल्यावर मुस्लिम असा उल्लेख असून दुसऱ्या दाखल्यात हिंदू असा उल्लेख आहे.

“एक और फर्जीवाड़ा. अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहेत दाऊद ज्ञानदेव,” असं नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.