Scorpio-N आणि XUV700 मध्ये दोष? महिंद्रा कंपनीने गाड्या मागवल्या परत
वाहन उत्पादक कंपनी महिंद्राने काही काळापूर्वी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लॉन्च केलेली महिंद्रा XUV700 आणि Mahindra Scorpio N या गाड्या परत मागवल्या आहेत. महिंद्राने परत मागवलेल्या मॉडेल्समध्ये Scorpio-N च्या 6,618 युनिट्स आणि XUV700 च्या 12,566 युनिट्सचा समावेश आहे. ही सर्व मॉडेल्स मॅन्युअल ट्रान्समिशन युनिट्स आहेत. CarToq मधील एका अहवालानुसार, कंपनीने काही त्रुटींच्या कारणास्तव SUV परत मागवल्या आहेत, या दोन्ही गाड्यांच्या क्लच बेल हाऊसिंगमध्ये सापडलेल्या रबर बेलोमुळे ‘ऑपरेशनल डायमेंशनल क्लिअरन्स’वर परिणाम होऊ शकतो. रिकॉलचा उद्देश रबर बेलोची तपासणी करणे आणि बदलणे हा आहे.
महिंद्राने परत मागवलेली ही सर्व मॉडेल्स मॅन्युअल ट्रान्समिशन युनिट्स आहेत. या गाड्या तपासण्यासाठी ग्राहकांना डीलरशिपद्वारे बोलावले जाईल. यानंतर ग्राहकांना त्यांची कार एसयूव्ही डीलरकडे न्यावी लागेल. काही दोष आढळल्यास, आवश्यक भाग बदलले जातील. विशेष म्हणजे यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
महिंद्राच्या अधिकृत अहवालात उल्लेख करण्यात आला आहे की, कंपनीने म्हटले आहे की स्कॉर्पिओ-एन मॅन्युअल ट्रान्समिशन वाहनांची 6618 युनिट्स आणि XUV700 मॅन्युअल ट्रान्समिशन वाहनांची 12,566 युनिट्स परत मागवण्यात आली आहेत. यामध्ये 1 जुलै ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान उत्पादित केलेल्या मॉडेल्सचा समावेश आहे. महिंद्रा ही मर्यादित तपासणी आणि त्यानंतरच्या दुरुस्तीमध्ये सक्रियपणे गुंतलेली आहे. डीलरशिपद्वारे ग्राहकांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जाईल.