माढा तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न.

माढा:
सावित्रीबाई फुले प्रशालेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित माढा तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन, सोलापूर जिल्हा परिषद सदस्य मा. श्री रणजितसिंह बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलता असताना मा. श्री रणजितसिंह शिंदे यांनी “कुठलीही स्पर्धा ही पारदर्शकपणे पार पडली पाहिजे व ती खेळभावनेने खेळली गेली पाहिजे. यातूनच आपल्याला भविष्यातील दर्जेदार खेळाडू मिळत असतात.” अशा शब्दात आपली भावना व्यक्त करत खेळाडूंचे मनोबल वाढवले.

या शुभप्रसंगी आर्या पब्लिक स्कूलचे श्री. मुसळे सर, कन्हेरगाव विद्यालयाचे श्री.लोंढे सर, विठ्ठलराव शिंदे प्रशाला निमगाव (टें) चे श्री.कुंभार सर, नुतन विद्यालयाचे श्री.संदीप ईश्वरे सर, लऊळचे श्री.नलवडे सर, न्यू इंग्लिश स्कूल टेंभुर्णीचे श्री.खटके सर, माढा तालुका क्रीडा समन्वयक श्री.संजय सर, नंदकिशोर विद्यालय उपळाईचे श्री.तांबोळी सर, नवभारत विद्यालय दारफळचे श्री.कांबळे सर, अंबाड विद्यालयाच्या शिक्षिका प्रगती कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

पंच म्हणून श्री. अग्रवाल सर आणि श्री.अंकुशराव सर यांनीदेखील त्यांची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली. सर्वांच्या उपस्थितीत स्पर्धेचा आरंभ झाला आणि खेळाडूंनी आपल्या उत्तम कौशल्याचे प्रदर्शन करत स्पर्धेत सहभाग नोंदवला. यावेळी स्पर्धेचे नियोजन उत्तम आणि चोख झाले असे सर्व उपस्थितांनी आयोजकांचे तसेच सहभागी खेळाडूंचे कौतुक केले.

(सोलापूर ) माढा, सावित्रीबाई फुले प्रशाला, (२३-जुलै-२०२४)

Leave A Reply

Your email address will not be published.