LIC चा IPO कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले स्पष्टीकरण

LIC चा IPO कधी येणार? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले स्पष्टीकरण

LIC चा IPO कधी येणार? हा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना पडला आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या मेगा आयपीओ (IPO) ची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत आहेत. या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एलआयसीचा आयपीओ याच आर्थिक वर्षात येणार आहे आणि येत्या मार्चपूर्वी एलआयसीचा आयपीओ बाजारात येऊ शकतो असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (7 डिसें.) स्पष्ट केले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी LIC IPO प्रगतीचा आढावा घेतला.

सरकारने एलआयसीच्या आगामी मेगा IPO वर कायदेशीर सल्लागार म्हणून सिरिल अमरचंद मंगलदास यांची निवड केली आहे. कायदेशीर सल्लागाराव्यतिरिक्त, सरकारने भारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरचे व्यवस्थापन करण्यासाठी 10 शीर्ष जागतिक आणि भारतीय व्यापारी बँकांची नियुक्ती केली आहे. तसेच कन्सेप्ट कम्युनिकेशन्सची जाहिरात एजन्सी म्हणून आणि Kfintech ची IPO साठी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणून निवड केली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने एका पत्रकात म्हटले आहे की त्यांनी गोल्डमन सॅक्स, जेपी मॉर्गन, सिटीग्रुप, नोमुरा, बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज, जेएम फायनान्शिअल, एसबीआय कॅप्स, कोटक महिंद्रा कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि अॅक्सिस कॅपिटल यांची आयपीओ व्यवस्थापित करण्यासाठी नियुक्ती केली आहे.

एलआयसीचा आयपीओ हा देशातील आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. मार्चपूर्वी आयपीओ बाजारात येईल, असा सरकारचा दावा आहे, पण या दाव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. याची अनेक कारणे आहेत. यासंबंधीच्या अनेक बाबींवर सरकारला स्थिती स्पष्ट करायची आहे. त्यात भागधारकांना हस्तांतरित करण्यात येणार्‍या अतिरिक्त (सरप्लस) किंवा नफ्याचा हिस्सा देखील समाविष्ट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.