आपल्या माता-भगिनी नेहमीच संसाराच्या व्यापात, मुलाबाळांच्या संगोपनात व्यस्त असतात. अध्यात्माची गोडी असूनही ती जपण्यासाठी मात्र त्यांना जराही उसंत मिळत नाही. आपणही परमेश्वराच्या दारी जावं, त्याच्या चरणी लीन व्हावं अशी इच्छा सर्वच माता भगिनींच्या मनात असते. संपूर्ण खेड तालुक्यातील महिलांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘श्री. बाबाजी रामचंद्र काळे मित्र परिवार सोशल फाउंडेशन’ व ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार’ यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे.
श्री. बाबाजी रामचंद्र काळे मित्र परिवार सोशल फाउंडेशन व शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार यांच्यावतीने खेड तालुक्यातील महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा उपक्रम राबविण्यात येत असून १- कोल्हापूर महालक्ष्मी-ज्योतिबा, २- वणी-त्र्यंबकेश्वर, ३- मढी-मोहटादेवी अशा तीन वेगवेगळ्या देवदर्शन यात्रांचे आयोजन करण्यात आले असून यापैकी आपल्या इच्छेप्रमाणे कोणत्याही एका यात्रेची निवड करून मोफत देवदर्शनाचा लाभ घेण्याची संधी खेड तालुक्यातील सर्व महिलांना उपलब्ध झाली आहे.
या मोफत देवदर्शन यात्रेस खेड तालुक्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभत असून दररोज अकरा बस भरून खेड तालुक्यातील महिला विविध तीर्थक्षेत्रास देवदर्शनासाठी जात आहेत. आतापर्यंत १० दिवसांत ४४०० महिलांनी त्र्यंबकेश्वर – वणी येथे देवदर्शनाचा लाभ घेतला आहे, तर ११०० महिलांनी ज्योतिबा – महालक्ष्मी व ७०० महिलांनी मढी – मोहटादेवी येथे देवदर्शन केले आहे.
या देवदर्शन यात्रेसाठी श्री. बाबाजी रामचंद्र काळे मित्रपरिवार सोशल फाउंडेशन व शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार यांच्यावतीने महिलांसाठी मोफत प्रवासासोबतच चहा-पाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था ही मोफत करण्यात आली आहे. हा सेवाभावी उपक्रम २५ सप्टेंबर पर्यंत राबवण्यात येणार असून मिळणारा प्रतिसाद पाहता २५ सप्टेंबर पर्यंत ३५ ते ४० हजार महिलांना मोफत देवदर्शन घडवण्याचा मानस श्री. बाबाजी रामचंद्र काळे मित्रपरिवार सोशल फाउंडेशन व शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार यांनी व्यक्त केला आहे, तसेच जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन सेवेची संधी द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.