पोलिसांची अशीही तत्परता, उभ्या पावसात दोन किमी चालून घनदाट जंगलात केली मदत!
प्रसिध्द राजकीय रणनितिकार प्रतिक वर्मा यांना कर्नाटकच्या प्रवासात @googlemaps ने एका घनदाट जंगलात नेले. ते जसे जसे पुढं जातील तसा हा रस्ता अधिकच धोकादायक बनत गेला. एक वेळ अशी आली की googlemaps सुद्धा काम करेना. वर्मा अशा जागी अडकले होतो की त्यांचे पुन्हा माघारी वळणे सुद्धा अशक्य झाले होते. गुढग्या एवढ्या चिखलात गाडी अडकून पडली होती. वैतागून त्यांनी शेवटी ११२ नंबरवर इमर्जन्सी कॉल केला, मदत मिळेल या आशेने सतत फोन करत राहिले. त्यांच्या या प्रयत्नांना शेवटी प्रतिसाद मिळालाच…
माहिती मिळताच कर्नाटकातील बेळगाव पोलीस दलाचे पोलीस अधिकारी शिवकुमार बल्लारी व शिवानंद दासोग यांनी त्यांचा शोध घेणे सुरू केलं. या घनदाट जंगलात कोसळणाऱ्या मुसळधार पावसात १ – २ किमी पेक्षा अधिक अंतर चालून या दोन्ही जिगरबाज पोलीस अधिकाऱ्यांनी शेवटी प्रतिक वर्मा यांना शोधलेच…
त्यांची गाडी चिखलात पूर्णतः अडकलेली होती ती गाडी काढण्यासाठी सुद्धा त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी एक ट्रॅक्टर बोलवून त्यांनी ओढून गाडी बाहेर काढून दिली. कर्नाटक पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आजच्या काळात पोलिसांकडे मदत मागायला सुद्धा सामान्य माणूस घाबरतो, हा समज बेळगाव पोलिसांनी आपल्या कृतीतून खोटा असल्याचं सिद्ध केलं.