अनिल देशमुख यांना कसं अडकवलं! जयंत पाटलांनी दाखवले प्रात्यक्षिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिग्गज नेते सध्या तुरुंगात आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. ही कारवाई चुकीची असून त्यांना यामध्ये अडकवण्यात आल्याचे राष्ट्रवादीकडून वारंवार सांगण्यात येते. मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु आहे. त्यामध्ये त्यांनी देशमुख आणि मलिक हे कसे निर्दोष आहेत हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले आहे. अभिनेते म्हणून नेहमीच वेगवेगळ्या भुमिका करत असताना चर्चेत असणारे शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंना थेट सचिन वाझेच्या भूमिकेत उभे केले. जयंत पाटलांनी देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देत असताना सचिन वाजेंच्या भुमिकेत कोल्हे यांना उभे केले. तर आमदार दिलीप मोहिते पाटलांना परमबीरसिंग आणि स्वत: अनिल देशमुखांच्या भुमिकेतून भर सभेत स्पष्ट्रीकरण दिले.
जयंत पाटील चाकण येथील राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त पक्षीय आढावा बैठकीत बोलत होते यावेळी देशमुख यांना खोट्या आरोपांमध्ये कसे अडकवले याचे प्रात्यक्षिकच पाटील यांनी कार्यकर्त्यांना दाखवले. यावेळी जयंत पाटलांनी स्वत: अनिल देशमुख यांची भुमिका घेत आ.दिलीप मोहिते पाटलांना परमबीरसिंग यांची तर खा. कोल्हेंना थेट सचिन वाझेच्या भुमिकेत उभे केले..! यावेळी पाटील म्हणाले, दिलीप मोहिते पाटलांनी (परमबीरसिंग) कोल्हेंना (सचिन वाझे) पोलिसांकडे पैसे गोळा करण्यास सांगितले. मात्र, प्रत्येक्षात पैशाचा आणि अनिल देशमुख (जयंत पाटील) वसुलीत काही संबध नसताना देशमुखांना अटक करण्यात आली, असे प्रात्यक्षिकासहित स्पष्टीकरण देत पाटील यांनी हा विषय कार्यकर्त्यांना सांगितला.