गृहमंत्र्यांच्या तालुक्यात प्राप्तिकर खात्याने टाकला छापा, उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घरावर देखील छापा

आंबेगाव | पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील पराग मिल्क या उद्योग समूहावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात हा छापा टाकल्याने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मंचरमधील उद्योजक देवेंद्र शहा यांच्या संबंधित उद्योग-व्यवसायांसह व घरावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. शहा यांच्या पराग मिल्क उद्योग समूहावर ही कारवाई सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

देवेंद्र शहा हे दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. शहा यांच्या पराग मिल्क, गोवर्धन उद्योग समूहाचे दूग्ध उत्पादन क्षेत्रात मोठे नाव आहे. वळसे पाटील यांच्या संबंधित व्यक्तीवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्तिकर विभागाच्या चार पथकांकडून ही कारवाई सुरू असून अवसरी येथील पीरसाहेब डेअरीचे पराग मिल्कसोबत काही व्यवहार आढळून आल्याने प्राप्तिकर विभागाने हि कारवाई केली आहे. या छाप्यात प्राप्तिकर विभागाने अनेक कागदपत्रे जप्त केली असून, त्यांची तपासणी सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.