नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना आज दिल्ली-गुवाहाटी फ्लाइटमध्ये इंधनाच्या वाढत्या किमतींबाबत विचारणा करण्यात आली , काँग्रेसच्या महिला विंगच्या कार्यवाहक प्रमुख नेट्टा डिसोझा या याबाबत विचारणा करत होत्या. डिसुझा आणि इराणी यांच्यात महागाई मुद्द्यावरून चांगलीच शाब्दिक चकमक झाली. नेटा डिसुझा यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केला आहे ज्यामध्ये मंत्री स्मृती इराणी देखील त्यांच्या सेल फोनवर त्या दोघींमधील संभाषण रेकॉर्ड करताना दिसत आहेत.
या ट्विटमधून डिसुझा म्हणतात की, “मोदी मंत्री @smritiirani जी, यांची गुवाहाटीला जाताना भेट झाली. एलपीजीच्या असह्य वाढत्या किमतींबद्दल विचारले असता, त्यांनी लसी, रेशन आणि गरीबांनाही दोष दिला! व्हिडिओ पहा. सामान्य लोकांच्या दुःखावर मंत्र्यांनी कशी प्रतिक्रिया दिली पहा!”
Faced Modi Minister @smritiirani ji, enroute to Guwahati.
When asked about Unbearable Rising Prices of LPG, she blamed Vaccines, Raashan & even the poor!
Do watch the video excerpts, on how she reacted to common people's misery ! 👇 pic.twitter.com/NbkW2LgxOL
— Netta D'Souza (@dnetta) April 10, 2022
विमानात इराणी यांनी सुरुवातीला सांगितले की काँग्रेस नेत्या “मार्ग अडवत आहेत”. मात्र काँग्रेस नेत्या डिसुझा यांनी स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि “गॅसशिवाय स्टोव्ह” या बद्दल इराणी यांना विचारले असता, “कृपया खोटे बोलू नका” असे इराणी या म्हणताना दिसत आहेत.
16 दिवसांत पेट्रोलच्या दरात 14 वेळा वाढ करण्यात आली असून, त्यामुळे दर प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भाडेवाढ झालेली नाही. दिल्लीत आता एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये, तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत — जिथे इंधनाच्या किमती सर्वाधिक आहेत — पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे तर डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर विकले जात आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होऊनही चार महिन्यांहून अधिक काळ इंधनाचे दर स्थिर आहेत असे सत्ताधारी सांगत आहेत तर याबाबत विरोधकांनी दावा केला आहे की दर स्थिर ठेवणे ही भाजपची निवडणूक होईपर्यंतची रणनीती होती. महागाई पुन्हा एकदा वाढत आहे आणि याच फटका सामान्य लोकांना बसत आहे. याबाबत मंत्री स्मृती इराणी यांनी किती संवेदनशील उत्तरे दिली हेही आपण या व्हिडीओतून पाहिले.