भारतीय लष्कराचा हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल, द्वेष पसरवणाऱ्यांना चपराक
सध्या देशात हनुमान चालिसा, मशिदीवरील भोंगे या सगळ्या धार्मिक आणि जातीय द्वेषाच्या बातम्यांची घटनांची चर्चा सुरू असताना लष्करातून मात्र दिलासादायक चित्र समोर आले. आजच्या राजकारणातील नाटकीय नेत्यांना चपराक लावणारा हा फोटो आहे. विविधतेतील एकता हे भारत देशाचे वैशिष्ट्य आपण अनेकदा ऐकलं, वाचलं, लिहिलं असेल. पण नागरिक म्हणून आपण म त्याचा अर्थ विसरत चाललो आहोत. आजच्या द्वेषाच्या वातावरणात भारतीय लष्कराने प्रेमाने भरलेला हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विविध जाती धर्माचे अनेक लष्करी अधिकारी, जवान एकत्र बसून नमाज अदा करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जे ‘विविधतेतील एकता’चे उत्तम उदाहरण आहे. या फोटोमध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि लेफ्टनंट जनरल डीपी पांडे काश्मीरमध्ये नमाज अदा करताना दिसत आहेत.
रमजानच्या पवित्र महिन्यात, लष्कराचे १५ वे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल डीपी पांडे शीख अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी आणि सैनिक नमाज अदा करताना दिसतात. व्हायरल होत असलेला हा फोटो जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचा आहे, जिथे भारतीय लष्कराचे जवान आणि लेफ्टनंट जनरल डीपी पांडे यांनी स्थानिक लोकांना एकतेचा संदेश दिला.
माजी आयपीएस अधिकारी @vssnathupur यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “भारतीय सैन्य अजूनही कट्टरता आणि कट्टरतावादाच्या विषाणूपासून वाचले आहे ही आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे…” हा फोटो संरक्षण सल्लागार @danvir_chauhan यांनी २५ एप्रिल रोजी शेअर केला होता. फोटो शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “श्रीनगरमध्ये रमजान दरम्यान नमाज अदा करताना लेफ्टनंट जनरल डीपी पांडे.” त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच चार हजारांहून अधिक रिट्विट्स करण्यात आले आहेत.
हा फोटो अशावेळी समोर आला आहे, जेव्हा यापूर्वी भारतीय लष्कराच्या पीआरओचे ट्विटर हँडल इफ्तारच्या फोटोंवर आक्षेप घेत हटवण्यात आले होते.
Lt Gen DP Pandey, Corps Commander 15 Corps, Srinagar offering namaz during Ramzan. #IndianArmyPeoplesArmy pic.twitter.com/ErjRaW9j7I
— Danvir Singh दानवीर सिंह (@danvir_chauhan) April 25, 2022