डुकराच्या मांस आयातीला मोदी सरकारची परवानगी; केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या भाजप सरकारचा हा निर्णय भाजप समर्थकांनाही अचंबित करणारा आहे. अमेरिकेतून (America) भारतात (India) डुकराच्या मांसाची (Pork Meat) आयात करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परवानगी देण्यात आली असून या निर्णयाकडे ऐतिहासिक पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. या निर्णयामुळे भारताची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली झाली असून अमेरिकेनं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अमेरिकेतील डुकरांपासून तयार केलेली विविध उत्पादनं, मांस आता भारतात आयात करणं या निर्णयामुळे शक्य होणार आहे.

अमेरिकेतून भारतात येणाऱ्या विविध कृषी उत्पादनांपैकी डुक्कर आणि त्या संबंधित उत्पादने भारतात आयात करायला आत्तापर्यंत केंद्र सरकारने परवानगी दिली नव्हती. या निर्णयामुळे अमेरिकेसाठी भारताचे दरवाजे आता पोर्क आणि पोर्क प्रोडक्ट विक्रीसाठी खुले झाले आहेत. अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंपैकी डुकरांचं मांस आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचं प्रमाण मोठं आहे. अमेरिका हा डुकरांच्या मांसाचं उत्पादन करणारा जगातील तिसऱ्या आणि निर्यात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश होता. या निर्णयामुळे अमेरिकेची निर्यात अधिकच वाढणार असून भारताच्या बाजारपेठेत अमेरिकी मांसाला व्यापाराची मुभा मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.