अर्शदीप सिंग हिरो बनायला गेला पण भारताच्या पराभवाचा व्हिलन ठरला, पाहा मैदानात काय केलं…

अर्शदीप सिंग हा भारताच्या पराभवाचा खरा व्हिलन ठरला, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. पण या गोष्टीसाठी आता पुरावेही तसेच मिळत आहेत. अर्शदीपने हा सामना गोलंदाजी करताना नाही तर फलंदाजी करत असताना गमावल्याचे आता समोर आले आहे.

भारतीय गोलंदाजांचे सारे आलबेल सुरु होते. पण अर्शदीप सिंग २०वे षटक टाकण्यासाठी आला आणि तिथे भारताला एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झाली. या षटकात अर्शदीपने नो बॉल टाकला आणि त्यावर षटकार बसला. त्यानंतर फ्री हिट देण्यात आला आणि त्यावही षटकारच बसला. त्यामुळे अर्शदीपच्या या एका षटकात भारताला २७ धावा गमवाव्या लागल्या. त्यामुळे न्यूझीलंडला १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. पण भारतासाठी १७७ धावा काही अशक्य नक्कीच नव्हत्या. पण भारताची या आव्हाचा पाठलाग करताना ३ बाद १५ अशी अवस्था झाली. त्यानंतर सूर्या आणि हार्दिक पंड्या यांनी काही काळ फटकेबाजी केली. पण हे दोघे पाच चेंडूंच्या फरकामध्ये बाद झाले आणि भारत सामना हरणार, असे चाहत्यांना वाटायला लागले. पण त्यावेळी वॉशिंग्टन सुंदर नावाची आशा कायम होती.

वॉशिंग्टन सुंदर हा दमदार फटकेबाजी करत होता. त्यामुळे तो भारताला हा सामना जिंकवून देऊ शकतो, असे वाटत होते. पण सुंदरच्या मार्गात यावेळी अर्शदीप आल्याचे पाहायाल मिळाले. ही गोष्ट घडली ती १८ व्या षटकात. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादव बाद झाला. त्यानंतर अर्शदीप हा फलंदाजीसाठी आला. यावेळी सुंदर हा खेळपट्टीवर सेट झाला होता. त्यामुळे तो चांगली फटकेबाजी करू शकतो, हे सर्वांनाच माहिती होते. पण यावेळी अर्शदीप सिंग हिरो बनायला गेला आणि व्हिलन ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण यावेळी अर्शदीपला फक्त एक धाव काढून सुंदरला स्ट्राइक द्यायची होती. पण या १८ व्या षटकाच्या पाचही चेंडूवर अर्शदीपला एकही धाव काढला आली नाही आणि हे षटक निर्धाव ठरले. सुंदर दमदार फलंदाजी करत होता आणि भारताचा पराभव हा २१ धावांनी झाल्याचे पाहायला मिळाले. अर्शदीपने यावेळी काही चेंडू सुंदरला खेळायला दिले असते तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.

Leave A Reply

Your email address will not be published.